नवी दिल्ली | हिंदुत्व म्हणजे सत्यासाठी सातत्यानं होणारं संशोधन असं महात्मा गांधी म्हणायचे. हे काम करता करता आज हिंदू समाज थकला आहे. तो झोपी गेला आहे. पण ज्यावेळी तो जागा होईल, त्यावेळी आधीपेक्षा अधिक ऊर्जेनं कामाला लागेल आणि सगळं जग प्रकाशमान करेल, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे.
दिल्लीत एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवत बोलत होते. यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
संपत्ती मिळवण्याच्या हेतूनं आक्रमक शक्तींनी भारतावर हल्ले केले. पण ते आपल्यामध्ये सामावून गेले. त्यानंतर इस्लाम वेगळ्या स्वरुपात आला. जो आमच्यासारखा होईल, तोच राहणार. जो आमच्यासारखा होणार नाही, त्याला राहण्याचा अधिकार नाही अशी त्यांची भूमिका होती, असं मोहन भागवत म्हणाले.
मुस्लिमांसोबत एकता स्थापन करण्याच्या प्रक्रियेला विस्थापित करण्याचा प्रयत्न औरंगजेबानं केला. आज देशात कोणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदू पूर्वजांचेच वंशज आहेत. कोणी आपल्याला बदलेल याचं भीती नाही. पण या गोष्टी आपण विसरून जाऊ याची भीती आहे, असं मोहन भागवत म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘भारतासाठी खेळायचं त्याचं स्वप्न आता पूर्ण होईल’; इशानच्या आईवडिलांना अश्रु अनावर
कॅनरा बॅंकेचं स्तुत्य पाऊल, हाऊसिंग तसेच एज्युकेशनल लोनला गती देण्यासाठी उपक्रम
“पेट्रोल-डिझेल की मार, क्या यहीं अच्छे दिन है यार?”
नव्या कृषी कायद्याविरोधात राहुल गांधींची आज ट्रॅक्टर रॅली!
राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!