बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुस्लिम मोहल्ल्यात शाखा उघडणार’; मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मजबूत करण्यासाठी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. अशातच मुस्लिम मोहल्ल्यांमध्येही संघाच्या शाखा उघडणार असल्याचं मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या चित्रकूटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंतन शिबिराचा आज समारोप झाला.

देशभरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये संघाच्या शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संघाशी मुस्लिमांना जोडण्यात येणार आहे. त्याशिवाय संघाने सोशल मीडियावरही अधिक सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय संघाने आयटी सेल उघडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

आरएसएसच्या चिंतन बैठकीमध्ये प्रांत प्रचारकांना त्यांच्या कामाचे स्वरुप समजावून सांगण्याबरोबरच पुढील वर्षभरामध्ये संघाकडून काय काय कार्यक्रम आखण्यात आले आहेत, याची कल्पना सध्या तरी देण्यात आली आहे. तसेच संघाने काही महत्वाच्या पदांमध्ये बदल केला आहे.

दरम्यान, क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशी यांचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांचं मुख्यालय चंदीगडमध्ये असेल. त्याशिवाय भैयाजी जोशी यांच्याकडे संघाकडून विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना विहिंपचे संपर्क अधिकारी करण्यात आलं आहे. डॉक्टर कृष्णा गोपाल यांना विद्या भारतीचे संपर्क अधिकारी करण्यात आले आहे. तर सरकार्यवाहक अरुण कुमार हे संघ आणि भाजप दरम्यान समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

….म्हणून करीना कपूरचं नवं पुस्तक प्रकाशित होताच वादाच्या भोवऱ्यात

‘मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते’; पंकजा मुंडेंचा स्वपक्षावर अप्रत्यक्ष घणाघात

“तुमचं दुःख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू तुम्ही घरी घेऊन जा”

‘दिलीप कुमार उत्कृष्ठ अभिनेते होते पण…’, नसीरुद्दीन शाह यांंचं मोठं वक्तव्य

“भाजप बहुजन चेहरे वापरतो अन् नंतर बाजूला करतो, फडणवीस खोटारडे मुख्यमंत्री होते”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More