बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: जॅकलीनच्या चौकशीत धक्कादायक गोष्टींचा खुलासा

मुंबई | तिहार तुरुंगातून 200 कोटींपेक्षा जास्त खंडणीचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. हा तपास आता बॉलिवूडपर्यंत येऊन ठेपला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहे. जॅकलीन फर्नांडिसची पाच तास झालेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे.

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात पाच तास झालेल्या कसून चौकशीत जॅकलीननं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मनी लॉन्ड्रिंग हे प्रकरण कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर या व्यक्तीशी संबंधित आहे. त्याच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जॅकलीनची फसवणूक झाली असल्याचं समोर येत आहे.

तिहार कारागृहातून 200 कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर जॅकलिनला फोन करत असे. पण आपल्याला फोन करणारी व्यक्ती ही तुरुंगात आहे याबाबत जॅकलीनला माहिती नसल्याचं तिनं चौकशीमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणात जॅकलीनला अडकवण्यात आलं असल्यानं साक्षीदार म्हणून जॅकलीनची चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, खरी ओळख न सांगता सुकेश जॅकलीनला फोन करत असे. त्यानं जॅकलीनला महागडे गिफ्टही पाठवले होते. मात्र आपल्याला भेटवस्तू पाठवणारी व्यक्ती ही जेलमध्ये असल्याची भनकही जॅकलीनला नसल्याचं तीनं चौकशीत म्हटलं आहे. सुकेश चंद्रशेखरनं जॅकलीनलाच नाही तर आणखी एका अभिनेत्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय; जवळच्या मैत्रिणीने केला ‘हा’ खुलासा

जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला लवकरच भारतीय बाजारात; ‘या’ चार इलेक्ट्रिक गाड्यांना मंजुरी

वादात सापडलेल्या ‘त्या’ जाहिरातीवर झोमॅटोने दिलं स्पष्टीकरण

‘मुलींनी कंडोम विकत घेण्यात गैर काय?’;’या’ अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य

…अन् काँग्रेसच्या माजी आमदारानं एका बुक्कीत फिरता फॅन रोखला; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More