बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 425 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 400 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 2 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,48,593 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 5098 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,164 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,24,821 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायली हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थो़डक्यात बातम्या-

तरुणांना तिशीतच का येतोय हार्टअटॅक?, महत्त्वाची कारणं आली समोर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

…अन् माहीने पुन्हा एकदा जिंकलं मन; धोनीच्या ‘त्या’ निर्णयाचं सर्वत्र कौतूक

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ! पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More