बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पहाटे भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं पाकिस्तान, 20 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

इस्लामाबाद | मुसळधार पावसानं जगभारत चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. आज पहाटे पाकिस्तानमध्ये भूकंप झाला आहे. सुमारे साडेतीनच्या सुमारास हा भूकंप झाला आहे. अचानकपणे झालेल्या भूकंपामुळे तेथील नागरिकही अजून धक्क्यात आहे.

पाकिस्तामधील हरनई परिसरात ही घटना घडली असून या घटनेत 20 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपामुळे तेथील नागरिक घाबरुन गेले आहेत. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. सध्या मृतांची संख्या तपासली जात आहे.

पाकिस्तानात भूकंपात 20 जणांना मृत्यू झाला असून 150 जण जखमी आहेत. भूकंपामध्ये अनेकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता या भूकंपामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, मागेही पाकिस्तानमध्ये भूकंप झाला होता. मात्र त्या भूकंपामध्ये कोणतीही जिवितहाणी आणि वित्तहाणी झाली नव्हती. त्यामुळे चिंतेचे काही कारण नव्हते.

थोडक्यात बातम्या – 

”अंधार आणखी गडद होणार असेल तर हा बदलत्या देशाचा नवा विकास म्हणायचा का?”

राहुल गांधी, प्रियंका गांधी अखेर लखीमपूर पीडित कुटुंबीयांच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘या’ ठिकाणी मुसळधार पावसानं घर कोसळून पाच जण ठार

लखीमपूर प्रकरणात मोठी घडामोड,सर्वोच्च न्यायालयाची गंभीर पावलं; सरकारच्या अडचणी वाढणार?

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; सरकारकडून मदत जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More