Top News कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात एका दिवसात 4 हजाराहून अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

पुणे | पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. पुण्यात काल दिवसभरात 4134 नविन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

एकूण सापडलेल्या रुग्णांपैकी पुणे शहरातील 1 हजार 978 रुग्ण आहे, पिंपरी-चिंचवडमधील 1 हजार 28, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 788, नगरपालिका क्षेत्रातील 221 आणि कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील 109 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आकडा 2 लाख 24 हजार 826 इतका झाला आहे.

काल दिवसभरात 3 हजार 776 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. यामधी पुणे शहरातील 1 हजार 587, पिंपरी-चिंचवडमधील 1 हजार 682, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 365, नगरपालिका क्षेत्रातील 96 आणि कँटोन्मेंट बोर्डमधील 36 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे 5 हजार 143 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये शहराबाहेरील 178 जणांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा- रामदास आठवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी 5 खासदारांना कोरोनाची लागण!

कोरोनावर लस आली की विश्वासार्हतेसाठी मीच पहिल्यांदा घेईन- केंद्रीय आरोग्यमंत्री

“…यांना बाहेरगावी फिरायला सोबत अमराठीच लागतात अन् दगडी मारायला मराठी माणूस”

सत्तेतील श्रीमंत मराठा आमदारांनाच आरक्षण नकोय- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या