बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

8 महिन्याच्या चिमुकल्याला यकृतदान करून आईनं दिला दुसरा जन्म!

पुणे | काही दिवसांपूर्वी साडेआठ महिन्याच्या बाळाला कावीळ झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे त्याला उपचारासाठी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात आणलं होतं. वैद्यकीय चाचण्यांमध्ये बाळाला एका दुर्मिळ आजारानं ग्रासल्याचं समोर आलं.

बाळाला यकृत संबंधित अलजाईल सिंड्रोम नावाचा आजार झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे त्याच्यावर यकृत प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. दुर्मिळ आजारानं ग्रासलं असल्याचं कळताच जन्मदातीनं आपल्या लेकराला वाचवण्यासाठी आपल्या यकृताचा काही भाग दान केला आहे.

आईने यकृत दान केल्यामुळे बाळावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया होऊ शकली. शस्त्रक्रियेदरम्यान बाळाच्या शरीरात अनेक गुंतागुंतीची समस्या तयार झाली होती. शिवाय वजन कमी झाल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या.

आईच्या यकृताचा काही भाग बाळाच्या यकृताला जोडण्यात आला आहे. या बाळावर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून बाळाने उपचाराला योग्य प्रतिसाद दिल्यामुळे बाळाला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात नरेंद्र मोदींना भेटू- अजित पवार

“मराठा समाजाने आता आंदोलन नाही, लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा”

कोरोनाबाधितांसाठी विरुष्काचा मदतीचा हात; ‘इतक्या’ कोटींची केली मदत

संकटं आल्यामुळेच मी घडले- सिंधूताई सपकाळ

‘मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच मन की बातची टेप लावली’; मुख्यमंत्र्यांची मोदींवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More