बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेमडेसिवीर मिळत नसेल तर… खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं ‘हे’ पर्यायी औषध!

मुंबई | सध्या राज्यात रेमडिसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना ग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांची रेमडिसिवीरसाठी धावाधाव होत आहे. पुणे आणि मुंबई सारख्या शहरात देखील रेमडिसिवीरसाठी लांबच्या लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना झाल्यावर प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून हे एकच औषध आहे का? असा सवाल सर्वांनाच पडला आहे. त्यातच आता शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी डाॅक्टरांना रेमडेसिवीरवर पर्यायी औषध सुचवलं आहे.

रेमडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावं? लक्षात घ्या,रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर सुचवलं आहे. ते रुग्णाला द्यावं, असा सल्ला त्यांनी डाॅक्टरांना दिला आहे.

शासन व प्रशासन रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु सातत्याने वाढत्या रुग्णसंख्येमुळे याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचवलेली औषधे रुग्णांना देता येतील. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिलं जावं, अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.

दरम्यान, रेमडिसिवीर पेक्षा ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करावं. काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने प्लाझ्मा थेरेपीची ट्रायल बंद केली आहे. तरीही डॉक्टरांकडून मागणी केली जात असल्यामुळे प्लाझ्मासाठी नागरिकांची धावपळ होत आहे. कोविड टास्क फोर्सने सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन करावं, असं अमोल कोल्हे यांनी याआधी पुण्यातल्या आढावा बैठकीत सुचवलं होतं.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! 50 टक्के लोकांमध्ये आढळली कोरोनाची ‘ही’ नवी लक्षणं

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; कोण मारणार बाजी?

सिनेसृष्टीला मोठा धक्का; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन

‘लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो, पण…’; समोर आली ही महत्वाची माहिती

“…तर मग कुंभमेळाव्यातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More