बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान मोदी सुर्यासारखे तर शरद पवार हे शकुनी मामा- पुनम महाजन

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी सुर्यासारखे आहेत तर शरद पवार हे शकुनी मामा आहेत, अशा शब्दात भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

सीएम चषकाच्या कार्यक्रमात बोलताना खासदार महाजन यांनी थेट पवारांवरच आसूड ओढायला सुरूवात केली. पवारांना त्यांनी ‘शकुनी मामा’ची उपमा देत त्यांच्यावर टीका केली.

हे ‘महागठबंधन’ नाही तर ‘महाठगबंधन’ आहे, अशा शब्दात त्यांनी महाआघाडीची खिल्ली उडवली. ‘महाठगबंधन’च्या दलदलीत ‘कमळ’चं फुलणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, युतीवर भाष्य करताना त्यांना प्रमोद महाजनांची आठवण झाली. त्या म्हणाल्या बाबा नेहमी म्हणायचे, सचिन आणि सौरव रणजी मॅचमध्ये विरूद्ध खेळतात पण देशाची गोष्ट आली दोघेही ओपनिंगला जातात, अशा शब्दांत त्यांनी युतीचा पुरस्कार केला.

 महत्वाच्या बातम्या-

… तर ‘त्या’ दिवशी शरद पवार पंतप्रधान होतील- देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदी राजकारणातून निवृत्त झाल्यास मी पण राजकारण सोडेन- स्मृती इराणी

“गाय एक जनावर आहे तिला माता म्हणणाऱ्यांच्या डोक्यात शेण भरलंय!”

“शिवसेनेला अण्णांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं”

-महाघोटाळा दडपला; ‘डीएचएफएल’ने फाडली भाजपची 20 कोटींची पावती!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More