खासदार सुप्रिया सुळेंचे खड्ड्यांसोबत सेल्फी, जनतेलाही आवाहन

पुणे | राज्यातील रस्त्यावरील खड्ड्यांवरुन राजकारण तापायला सुरुवात झालीय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी  नावाची मोहिम सुरु केलीय. 

खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. चला तर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊया. मी सुरुवात केलीय. तुम्ही करताय ना? असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. 

पुण्याच्या कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव भागातील रस्त्यावरील खड्ड्यासोबत त्यांनी सेल्फी काढले आणि ते सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत.