पुण्यात एकवटले MPSCचे विद्यार्थी, सरकारविरोधात एल्गार

पुणे | राज्यसेवा परीक्षेमार्फत प्रशासनात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे, त्याचा पहिला स्फोट पुण्यात झालेला पहायला मिळाला. या विद्यार्थ्यांनी एकत्र येत मूकमोर्चा काढला. 

राज्यसेवा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा लोंढा वाढतच आहे, त्यामुळे राज्यसेवा परीक्षेच्या जागा वाढवाव्या, तलाठी परीक्षा राज्यसेवेद्वारे घ्यावी या आणि अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, पुण्यातच नव्हे तर बीड, अहमदनगर अशा राज्याच्या विविध जिल्ह्यांच्या ठिकाणीही या विद्यार्थ्यांनी आज मोर्चांचं आयोजन केलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलाय.