एमपीएससीवरील स्थगिती कायम, कोर्टानं सरकारला फटकारलं

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कार्यपद्धती न्यायालयाचा अवमान करणारी आहे, त्यामुळे कंन्टेंप्ट ऑफ कोर्टअंतर्गत राज्य सरकारवर कारवाई का करु नये, असं सवाल उच्च न्यायालयानं केलाय. सोबत एमपीएससीच्या प्रवेश प्रक्रियेवरील स्थगिती कायम ठेवलीय. 

खुल्या गटातून अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना अपात्र ठरवणाऱ्या आयोगाच्या निर्णयाविरुद्ध याचिका करण्यात आलीय. या याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयानं राज्य सरकारला फैलावर घेतलं. 

राज्य सरकारने सरकारी वकील नियुक्त करण्यासाठी 1 आठवड्याची मुदत मागितलीय. त्यामुळे याप्रकरणाची अंतिम सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.