पुणे | राज्य परिवहन महामंडळाकडून पुणे जिल्ह्याअंतर्गत 40 मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेला नुकतीच सुरुवात झाली असून याला प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद नसल्याचं एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.
नेहमीच्याच दरात ही एसटीची सेवा सुरु करण्यात आली असून या प्रवासासाठी सध्या पोलिसांकडून घ्याव्या लागणाऱ्या कुठल्याही ई-पासची आवश्यकता नाही, असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
आम्ही पुणे जिल्हांतर्गत एसटी सुरु केली असून सध्या 55 बसेस रस्त्यांवर धावत आहेत. सरकारनं फिजिकल डिस्टंसिंगच्या घालून दिलेल्या नियमांप्रमाणे प्रत्येक बसमध्ये तिच्या क्षमतेपेक्षा निम्म्याच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. यांपैकी 10 ते 12 एसटी गाड्या या वाकडेवाडी आणि स्वारगेट बस डेपोमधून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोडण्यात येत आहेत. तर इतर बससेवा या तालुक्यांच्या मुख्यालयांना जोडणाऱ्या असणार आहेत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.
सध्या या एसटी गाड्या पुण्याहून बारामती, भोर, शिरुर, सासवड, नारायणगाव, राजगुरुनगर, इंदापूर, दौंड, पाटस, नीरा, जुन्नर, आळेफाटा, भीमाशंकर, वेल्हा, पौड, मुळशी तसेच बारामती-भिगवण, बारामती-वालचंदनगर, बारामती-दौंड, स्वारगेट-वेल्हा, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, नारायणगाव-जुन्नर आणि जुन्न-देवळे या मार्गावर सुरु करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबत लवकर निर्णय होणं आवश्यक आहे- सुप्रिया सुळे
सुशांतच्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणं म्हणजे मुंबई पोलिसांचा अपमान- संजय राऊ
व्हाॅट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करत रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा!
पश्चिम घाटात गोगलगायीसंदर्भात संशोधनासाठी तेजस ठाकरेंना परवानगी, आशिष शेलार म्हणाले
“नारायण राणेंना कामधंदा उरला नाही, घरी एक बोलतात, बाहेर वेगळंच”
Comments are closed.