बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर; तब्बल 123 रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद | कोरोनानंतर महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये बुरशीजन्य आजाराचे नवे रुग्ण सापडण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. एकीकडे कोरोना आटोक्यात येत असताना नव्या आजाराने डोकं वर काढल्याने प्रशासनासह नागरिकांच्याही चिंतेत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असल्याचं गंभीर चित्र दिसून येत आहे. म्युकरमायकोसिसमुळे औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 123 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मागच्या 24 तासात 02 रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1031 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले असून मागच्या दोन दिवसात 11 रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच सध्या 245 सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. म्युकरमायकोसिसचा औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कहर वाढत चालल्याचं भयावह चित्र निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या 663 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 123 रुग्णांचा बळी गेल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. या नव्या आजाराला रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. तसेच आता हा आजार कधी आटोक्यात येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘या’ ठिकाणी देशभक्तीपर गीतांच्या तालावर 100 लोकांनी सलग दोन तास केली योगासने

36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही; मराठा क्रांती आंदोलनाबद्दल संभाजीराजेंचं मोठं विधान

“काँग्रेस अन् राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे त्यांनी लक्षात घ्यावं”

मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार?; विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्वाची माहिती

“अजितदादा शरद पवारांचं ऐकत नाहीत हे मला माहित होतं, पण आता…”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More