बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता काही सेकंदात कळणार कोरोना चाचणीचा निकाल; मुकेश अंबानी बोलवणार इस्राईलची विशेष टीम

मुंबई | सध्या देशात कोरोनाचं निदान करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. पण आता आता काही सेकंदात कोरोना चाचणीचा निकाल कळू शकणार आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केंद्र सरकारकडे इस्रायलच्या टीमला भारतात बोलावण्यासाठी विशेष परवानगी मागितली आहे. इस्राईल हा देश नुकताच ‘कोरोनामुक्त देश’ जाहीर झाला आहे.

इस्राईलची टीम भारतात येऊन रॅपिड कोविड 19 आयडेंटिफिकेशन सोल्युशनची स्थापना करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने इस्त्रायली स्टार्टअप कंपनी ब्रॅथ ऑफ हेल्थकडून 1.5 कोटी डॉलर्सचे आयडेंटिफिकेशन सोल्युशन खरेदी केले आहे. त्यामुळे भारतात कोरोना चाचणी सोपी आणि वेगवान होणार आहे. भारतात आल्यावर ही इस्त्रायली टीम भारतीयांना प्रशिक्षण सुद्धा देणार आहे.

इस्त्रायल सरकारने आपल्या नागरिकांना सध्या भारतात येण्यास आणि जाण्यास बंदी घातली आहे. असं असताना देखील ब्रॅथ ऑफ हेल्थला रिलायन्सशी सौदा करण्यास परवानगी दिली गेली आहे. कोरोना कॅरिअर आणि रुग्णांना ओळखणारी ही प्रणाली देशात संक्रमणाची गती कमी करण्यात उपयुक्त ठरू शकते, असं सांगितलं जात आहे. या माध्यमातून कोरोना चाचणीचे निकाल काही सेकंदात मिळणार आहेत.

दरम्यान, आयडेंटिफिकेशन सोल्युशन पद्धतीने कोरोना संक्रमण शोधण्याचे प्रमाण 95 % आहे. तर सध्या भारतात वापरात असलेल्या आरटीपीसीआर चाचणीची यशस्वी क्षमता 98% मानली जात आहे. परंतू कोरोनाचा नवा व्हायरस समोर येत असल्यानं आरटीपीसीआर चाचणी पद्धत फेल होत आहे, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या-

“सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्या लोकांनी राजकीय भाष्य करू नये”

पुण्यातील कडक लाॅकडाऊनबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांचं सुचक वक्तव्य

पु.ल.देशपांडे यांची ‘ती’ व्हिडीओ क्लिप शेअर करत महाराष्ट्र पोलिसांनी दिला महत्वाचा सल्ला

“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गुदमरत आहेत, ते लवकरच आघाडीतून बाहेर पडतील”

कोरोनामुळे ‘या’ भाजप आमदाराचं निधन; आतापर्यंत 4 भाजप आमदार कोरोनाचे बळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More