नरेंद्र मोदी नव्हे इंदिरा गांधी सर्वात लोकप्रिय पंतप्रधान!

Photo- AFP

नवी दिल्ली | इंदिरा गांधी या भारताच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय. ते ‘इंडियाज इंदिरा-ए सेंटेनियल ट्रिब्यूट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

विसाव्या शतकातील प्रभावशाली व्यक्तींपैकी इंदिरा एक असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, राष्ट्रपतींच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगलीय. मुखर्जींना राष्ट्रपतीपदासाठी दुसरी संधी मिळणार नसल्याने ते इंदिरा गांधींचं गुणगान गात असल्याचं अनेकांनी म्हटलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या