बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्या सर्व प्रकरणांचा एकमेकांशी संबंध’; दाभोळकरांच्या मुलीचा मोठा गौप्यस्फोट

पुणे | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 8 वर्ष पूर्ण होऊनही त्यांच्या हत्येचे मुख्य सुत्रधार अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावर खटला भरावा, अशी मागणी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची मुलगी मुक्ता दाभोळकर आणि मुलगा हमीद दाभोलकर यांनी केली आहे.

डॉ. दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणामधील संशयित आरोपी पकडले गेले असले तरी, त्यांच्यावर खटला अद्याप सुरू झालेला नाही. जर खटला वेळेत सुरू झाला नाही तर याचा फायदा आरोपींना मिळून ते जामीनावर बाहेर येऊ शकतात. या खटल्यातील विक्रम भावे हे जामीनावर बाहेर आले आहेत. आम्ही या लढ्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यत गेलो आहोत, असं डॉ. दाभोळकरांच्या मुलांनी म्हटलं आहे.

डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर कॉ .गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी आणि यांच्या हत्या झालेल्या आहेत. या सर्व व्यक्तींच्या हत्या आणि नालासोपारा येथील सापडलेल्या स्फोटकांचा मोठा साठा हा सर्व मोठ्या व्यापक कटाचा भाग आहे. या प्रकरणात फक्त तरूण आरोपींना पकडून चालणार नाही. या कटामागे कोण लोक आहेत, त्यांना पैसा कुठून येतो. हे समोर येणं गरजेचं आहे, असं मत मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केलंय.

आमच्या मागण्या आहेत की, लवकरात लवकर हा खटला सुरू व्हावा आणि मुख्य सुत्रधार पकडले जावेत. अशी विचारश्रेणी बाहेर राहिल्यामुळे विवेकवादी लोकांच्या जीवाला धोका आहे. डॉ. दाभोळकर यांचं कार्य अंधश्रद्धा निर्मुलनाचं आहे. त्यांचे कार्य सुरू ठेवणं हीच त्यांना आदरांजली आहे, असं मुक्ता दाभोळकर म्हणाल्यात.

 

थोडक्यात बातम्या –

दुसरी लाट नियंत्रणात पण ‘या’ जिल्ह्यांनी संपुर्ण महाराष्ट्राचं टेंशन वाढवलं!

“नेहरू आणि वाजपेयी हे आदर्श नेते, सर्व पक्षांना आत्मपरिक्षणाची गरज”

नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणी धरू शकत नाही, त्यांनी देवालाही सोडलं नाही- अजित पवार

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पालघर दौरा रद्द!

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More