पुणे महाराष्ट्र

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबाबत मुक्ता टिळक यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

पुणे | पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग लागली आहे.

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीमागे घातपाताची शंका आमदार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केली आहे.

दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळतेय. सुदैवाने कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र हा घातपाताचा प्रकार वाटतोय, असं मुक्ता टिळक यांनी म्हटलंय.

जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

सोनू सूदला उच्च न्यायालयाचा मोठा झटका; कारवाई होण्याची शक्यता

दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर, शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

“आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत”

भारत विरुद्ध इंग्लंड मालिका पाहण्याचा विचार करताय?; थोडं थांबा BCCI देणार गुडन्यूज!

बच्चू कडूंच्या नेतृत्वात निघणार काॅंग्रेसचा मोर्चा, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या