मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. सोमय्यांनी ठाकरे सरकारवर अनेक आरोप केल्याचं पहायला मिळालं.
आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांवर तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं. सोमय्यांवर आरोप करताना “मुलुंडचा दलाल” असा उल्लेख संजय राऊतांनी केला.
मुलुंडच्या भडव्याने ठाकरे कुटुंबीयांनी कोर्लाई गावात 19 बंगले बांधून ठेवल्याचा आरोप केलाय. ही बेनामी प्रॉपर्टी आहे असं दावा त्यांनी केला आहे. माझं आव्हान आहे त्या माणसाला, माझं त्या दलालाला आव्हान आहे.. कधीही सांगा आपण चार बस करु आणि आपण त्या 19 बंगल्यात पिकनिकला जाऊ. जर तुम्हाला ते बंगले तिथं दिसले, तर मी राजकारण सोडेन, अंस राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.
दरम्यान, या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदारांना बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेना भवनाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आल्याचंही पहायला मिळालं.
थोडक्यात बातम्या –
“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”
“मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील”
“महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना अजिबात घाबरणार नाही”
दाऊदप्रकरणी ईडीची मोठी कारवाई! राज्यातील एका मंत्र्याचीही चौकशी
Russia-Ukrain War | भारतीय नागरिकांना दुतवासानं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
Comments are closed.