बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रूग्णांसाठी मुंबईत 1 हजार बेड्सचं रूग्णालय; सरकारकडून महापालिकेकडे सुपूर्द

मुंबई | वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समध्ये खास कोरोना रूग्णांसाठी रूग्णालय उभारण्यात आलं आहे. मुंबईतील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता सरकारने दक्षता म्हणून 1 हजार 34 बेड्सचं रूग्णालय उभारण्यात आलं आहे.

बीकेसी कॉम्पलेक्समध्ये उभारण्यात आलेलं खास कोव्हीडग्रस्तांसाठीचं हॉस्पिटल आज शासनाने मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसंच शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे तसंच राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी रूग्णालयाची पाहणी केली.

मुंबईत जर अधिक आकडे वाढले तर रूग्णालय सज्ज असावीत, म्हणून सरकारने हे पाऊल उचललं आहे. मोकळ्या मैदानामध्ये उभं राहणारं महाराष्ट्रातीलच नव्हे तर  देशातील पहिलं हॉस्पिटल मुंबईमधील असल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही- पृथ्वीराज चव्हाण

अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड

महत्वाच्या बातम्या-

मतदानादरम्यान मजुरांना गावी परतण्याची सोय करता, आपत्ती काळात विरोध कशाला- सदाभाऊ खोत

मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद

हे आघाडीचं सरकार आहे की वाधवान सरकार??; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More