बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘हे’ शहर कोरोनामुक्तीच्या वाटेवर; रूग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची गेल्या 24 तासातील आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात एकूण 953 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 2 हजार 258 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना कालची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 32 हजार 925 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 93 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 6 लाख 41 हजार 598 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील कालची रुग्णसंख्या ही मागच्या 2 ते 3 दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या असल्याचं दिसून येत आहे. एकेकाळी सर्वाधिक रूग्णसंख्या ही मुंबईत आढळुन येत होती, पण आता ही रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने मुंबई शहराची कोरोनामुक्तीकडे आगेकुच सुरू असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

आरोग्यमंत्र्यांनी महिनाभरात लसीचा दुसरा डोस घेतलाच कसा?; राजेश टोपेंनी सोडलं मौन, म्हणाले…

मोठी बातमी! ‘इतक्या’ दिवसात चालू होणार लहान मुलांवरील कोव्हॅक्सिनची चाचणी

“केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावेत”

मन सुन्न करणारी घटना! नवजात बालकाचा उंदराने कुरतडला पायाचा अंगठा, रूग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली विवाहबंधनात, पाहा फोटो

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More