बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या वाढली; वाचा आजची आकडेवारी एका क्लिकवर

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची  आकडेवारी ही काही प्रमाणात वाढल्याचं चित्र दिसून येत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 664 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकुण 744 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना आजची सक्रिय कोरोनाबाधितांची आकडेवारी ही काही प्रमाणात वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच आज बरे होणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याचं दिसून आलं.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 07 हजार 816 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 96 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 7 लाख 567 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकुच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत असलं तरी आज नव्या कोरोनाबाधितांमध्ये वाढ झाल्याने काही प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील रुग्णसंख्या ही मागच्या काही दिवसात हळुहळु कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण अचानक सक्रिय रूग्णसंख्या वाढल्याने येणाऱ्या काळात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येणार की, रूग्ण वाढत जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

 

थोडक्यात बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More