बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका!

मुंबई | जावेद अख्तर यांनी दाखल केलेली बदनामीची कारवाई रद्द करण्याची अभिनेत्री कंगना रनौतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जावेदने कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला.

कंगनाने आपल्या याचिकेमध्ये कलम 482 सीआरपी सारख्या याचिकेमध्ये जावेदच्या तक्रारीनंतर पोलिसांना चौकशीचे आदेश देण्याचा दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

जावेद यांनी कंगनावर त्यांच्याविरुद्ध खोटी वक्तव्ये करून आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला होता. कंगनाने आपल्या याचिकेमध्ये कलम 482 सीआरपी सारख्या याचिकेमध्ये जावेदच्या तक्रारीनंतर पोलिसांना चौकशीचे आदेश देण्याचा दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, डिसेंबरमध्ये कोर्टाने जुहू पोलिसांना कंगनाच्या विरोधात तपास करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून कंगना आणि जावेद यांच्यात वाद सुरू आहे. कंगनाला हे प्रकरण लवकरात लवकर संपुष्टात आणावं असं वाटत असलं तरी जावेद तसं करण्याच्या मनस्थितीत नाहीत.

थोडक्यात बातम्या- 

नितेश राणे आणि नीलम राणे यांच्यावरील लूकआऊट नोटीसवर गृहमंत्री म्हणाले…

‘महिलांचं काम फक्त मुलांना जन्म देणं, त्या कधीही…’; तालिबानी प्रवक्त्यांचं वादग्रस्त वक्तव्य

अमेरिकेची ‘ही’ प्रसिद्ध कंपनी भारतातून लवकरच आपला गाशा गुंडाळणार!

‘…म्हणून महेंद्रसिंग धोनीला केलंय विश्वचषकाच्या संघाचं मेन्टाॅर’; सौरव गांगुलीने सांगितलं कारण

प्रशांत किशोरांच्या मदतीची मला गरज नाही- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More