बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई कोरोनामुक्त होतंय! नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटली, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र, अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आनंदाची बाब म्हणजे आज मुंबईत नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची नोंद जास्त आहे.

मुंबईत आज दिवसभरात 263 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 438 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 9 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,35,922 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4430 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 15,920 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,13,161 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. प्रशासनाच्या कठोर पावलांमुळेच मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

“भाजप काँग्रेसचं नाव पुसायला निघाल्यामुळेच राज्यपालसुद्धा पंडित नेहरुंबद्दल काहीही बरळतात”

“राज्यपालांचा जो मान ठेवला पाहिजे त्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे”

घाई करा! आगामी काळात सोन्याचे दर दुप्पट होणार, वाचा आजचे दर

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

काय सांगता! कुत्रा मागे लागताच रेड्यानी ठोकली धूम, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल पोट धरून

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More