मुंबई | आगामी मुंबई महापालिका निवडणूकांचं बिगूल वाजताना दिसत आहे. त्याच बरोबर मुंबईत राजकीय वारे फिरायला सुरूवात झाली आहे. सर्वच पक्ष राजकीय शक्तीप्रदर्शन करण्यास तयार दिसत आहेत. दावे प्रतीदावे सुरु असताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत देिले आहेत. पण यामध्ये महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असणारा काँग्रेस पक्ष काय भुमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यातील आगामी सर्व महापालिका निवडणूका महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र लढाव्यात असं सूत्र ठरलं आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. त्याचसोबत या महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र राहिल पण, काँग्रेसला यात कसं सामावून घ्यायचं, याबद्दल चर्चा होईल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत, हे राष्ट्रवादीचं म्हणणं आहे, असं ‘बीबीसी मराठी’शी बोलताना सांगितलं होतं. पण नवनिर्वाचीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूका स्वतंत्र लढवल्या पाहिजेत.
दरम्यान, भाजप देखील या सर्व प्रकरणात लक्ष ठेवून आहे. भाजप आणि मनसे यांचं युतीबाबत चित्र सध्यातरी फाटकं दिसत असलं तरी पुढील काळात मोठे डावपेच दिसू शकतात.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या
“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांच्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”
‘…नाहीतर कोरोना पुन्हा येईल’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा इशारा
येत्या काळात भाजप ‘आरक्षण’ बाजूला काढेल- जितेंद्र आव्हाड
प्रसिद्ध गायिका नेहा कक्करला आहे ‘हा’ आजार, स्वत:च केला खुलासा म्हणाली…