बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने मुंबईत हायअलर्ट

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर रात्री 1 वाजता स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीस घेत आहे. संपूर्ण मुंबईमध्ये सध्या हायअलर्ट लागू करण्यात आला असून, पोलिसांचे धाडसत्र आणि कडक नाकाबंदी करून चौकशी सुरू आहे.

पेडर रोडवर असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या घरासमोर त्यांच्या गाडीशी मिळता जुळता नंबर असलेल्या नंबरची स्कॉर्पिओ गाडी नो पार्किंगच्या फलकाखाली लावण्यात आली होती. सदरील गाडीमध्ये 20 जिलेटीनच्या कांड्या आणि एक निनावी पत्र होतं ज्यामध्ये ‘ही फक्त झलक आहे’, असा उल्लेख करण्यात आला आहे.

सध्या मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनेची गंभीर दखल घेत आता हॉटेल्स, ढाबा आणि लॉजमध्ये जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडीही यामध्ये सहभागी असल्याचे दिसून आले आहे.

घटनास्थळी गाडी लाऊन या गाडीतून उतरलेला इसम संबंधित इनोव्हा गाडी मध्ये बसून जात असताना दिसत आहे. सध्या स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून याबाबत सखोल तपास पोलीस करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण!

घर बांधणं आता आणखी सोप्पं होणार; हसन मुश्रीफ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

चिंताजनक! नव्या कोरोनापासून शरिराच्या ‘या’ अवयवाला आहे सर्वाधिक धोका

1 मार्चपासून शाळा बंद की चालू??? शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

दलालांमुळे आपल्या शेतकर्‍याची घुसमट होऊ नये अशी माझी इच्छा- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More