बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हारी बाजी को जितना हमें आता है!; शेवटच्या 5 षटकांमध्ये चमत्कार झाला!

चेन्नई | आयपीएलचा पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉकच्या स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. अखेरच्या षटकात 15 धावांची गरज असताना कोलकताच्या फलंदाजांना केवळ 4 धावा करता आल्या आणि मुंबईने हा निसटता सामना जिंकला. कोलकाता सामना आरामात जिंकेल अशी चिन्हे होती परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकात धारदार गोलंदाजी केली आणि सामना आपल्याकडे वळवला. या विजयाबरोबरच मुंबईने या आयपीएल हंगामातील पहिला विजय मिळवला आहे.

सर्वप्रथम कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस लीनच्या जागी नुकतंच विलगीकरणातून बाहेर आलेल्या क्विंटन डिकॉकला संघात संधी दिली गेली. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी मुंबईची पारी सांभाळली. रोहित शर्माने 32 चेंडूत 43 धावा केल्या. तर सुर्यकुमार यादवने 36 चेंडूत आक्रमक खेळी करत 56 धावा केल्या. तर कोलकाताकडून आंद्रे रसलने केवळ 2 षटकात 15 धावा देत 5 बळी घेतले. त्यामुळे मुंबईचा संघ 155 धावा करत ऑल आऊट झाला.

त्यानंतर 156 धावांचा पाठलाग करताना कोलकताची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर नितीश राणानं पुन्हा एकदा चांगली खेळी करत सलग दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावलं. त्याने 47 चेंडूत 57 धावा केल्या. तर युवा फलंदाज शुभमन गिलने त्याचा मोलाची साथ दिली. शुभमनने 24 चेंडूत 33 धावा केल्या. पण त्यांनतर कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अखेरच्या 30 चेंडूत 32 धावांची गरज असताना देखील मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या फलंदाजांना मैदानात टिकू दिलं नाही आणि सामन्यात 10 धावांनी विजय मिळवला.

दरम्यान, आंद्रे रसलची गोलंदाजी या सामन्यात सर्वात चर्चेत राहिली. त्याने केवळ 2 षटक टाकले. 18 वं आणि 20 वं षटक त्याने टाकलं. त्यात त्याने केवळ 15 धावा देत  मुंबईचा अर्धा संघ तंबूत पाठवला होता.

थोडक्यात बातम्या-

संचारबंदीकाळात सरकारकडून कोणाला किती पैसे मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

लॉकडाऊनचे नियम- एकाच ठिकाणी संपूर्ण यादी

मुख्यमंत्र्यांनी जनतेशी साधलेल्या संवादात पंतप्रधानांना केलं ‘हे’ आवाहन

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एका क्लिकवर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More