अबब!!! एक खड्डा बुजवण्यासाठी १५ हजार रुपये खर्च!

मुंबई | रस्त्यावरील खड्डे मुंबई महापालिकेसाठी डोकेदुखीचा विषय ठरले असताना आता ते बुजवण्यासाठी येणाऱ्या खर्चावरुन वादळ उठण्याची शक्यता आहे. नव्या तंत्रज्ञानाने बुजवण्यात येणाऱ्या एका खड्ड्यासाठी १५ हजार रुपये खर्च येणार आहे.

शुक्रवारी भर पावसात पालिका मुख्यालयासमोरील दोन खड्डे नव्या मिश्रणाने बुजवण्यात आले. मिडास टच आणि स्मार्टफिल अशी या मिश्रणांची नावे आहेत. मात्र हे दोन खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ३० हजार रुपये खर्च आला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या