बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचं सत्य बाहेर येणार नाही- संजय राऊत

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्य़ा अँटेलिया बंगल्यासमोर 25 फेब्रुवारीला संशयित स्काॅर्पिओ गाडीमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यातच आता मनसुख हिरेन या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्र्यातील खाडीत सापडल्याने या प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. त्यांची हत्या झाली आहे की त्यांनी आत्महत्या केली आहे याचा तपास अजून चालू आहे.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयएद्वारे करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलंच फटकारलं आहे. विरोधक हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयद्वारे करण्याची मागणी करत आहेत. मात्र, हा तपास एनआयएकडे दिल्यानं यामागचं सत्य बाहेर येणार नाही. मुंबई पोलीस हा तपास करण्यास सक्षम आहे आणि आता तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे दिला आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

विरोधकांनी हिरेन मृत्यूप्रकरणी काही मुद्दे उपस्थित केले असतील किंवा मुद्देसुद माहिती दिली असेल तर त्याचा निश्चितच तपास व्हायला हवा. मनसुख यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत सर्वांच्याच मनात शंका आहे. ही शंका दूर झालीच पाहीजे, ही घटना दुर्देवी आहे. पण त्यांच्या मृत्यूचं कुणीही भांडवल करू नये, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान,हिरेन यांचा मृत्यू कसा झाला? कोणत्या कारणाने झाला? या प्रकरणाला कोण जबाबदार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर बाहेर यायला हवी. राज्याचं अधिवेशन सुरू असतांना एका महत्वाच्या प्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू होणं फार धक्कादायक आहे. जेवढ्या लवकर सत्य बाहेर येईल तेवढं सरकारच्या प्रतिष्ठा आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल. त्यामुळे विरोधकांनी लगेचच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या

चांगली खेळी करुनही पदरी निराशा, ‘सुंदर’चं शतक थोडक्यात हुकलं

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला पुन्हा दणका; दिले ‘हे’ आदेश

स्वॅब न देताच रुग्णाला दिला कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

महाविकास आघाडीला दणका; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ फेरविचार याचिका फेटाळली

ओडिशातील धक्कादायक घटना; पाठवणीवेळी खूप रडणं नवरीच्या जीवावर बेतलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More