महाराष्ट्र मुंबई

…म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केलं अटक

मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्या यांना मुलुंड येथील त्यांचं निवासस्थान निलम नगर येथून अटक करण्यात आली आहे. अटक करुन त्यांना मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. स्वत: किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आलेल्या तरुणाला भेटण्यासाठी आपण चाललो असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. किरीट सोमय्या यांना अटक केल्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारला दिल्ली मरकजहून परतलेल्या तबलिगी जमातच्या लोकांना शोधायला वेळ नाहीये, पण सामान्य जनतेला मदतकार्य करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना अटक करायला भरपूर वेळ आहे, असं ट्विट भाजपकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनानं चिंता वाढवलेली असताना जितेंद्र आव्हाड यांचं नाव एका प्रकरणामुळे मंगळवारपासून चर्चेत आलं आहे.

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“मुंबई अडीच लाख कोटी केंद्राला देते, त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला द्या”

358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल

महत्वाच्या बातम्या-

‘ट्रोलर्सच्या पाठीमागे फडणवीस अन् डावखरे तर नाहीत ना?’; आव्हाड प्रकरणावरून राष्ट्रवादी युवक आक्रमक

डोनाल्ड ट्रम्प यांची WHO ला धमकी, म्हणाले…

कोरोनाचा संसर्ग वाऱ्याच्या वेगाने पसरतोय; देशातली बाधितांची संख्या पोहचली 5 हजारांवर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या