बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनामास्क फिरणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी दिली अजब शिक्षा, पाहा व्हिडीओ

मुंबई | राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. मुंबईत निर्बंध कडक केले तरी नागरिक कोरोना नियमावलीचं पालन करत नसल्याचं दिसत आहे. अनेक नागरिक मुंबईच्या रस्त्यांवर विनामास्क फिरतांना दिसत आहे.

मुंबई पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांना एक अजब शिक्षा दिल्याचं समोर आलं आहे. वारंवार आवाहन करून देखील नियमांचं पालन न करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या नागरिकांना मुंबई पोलिसांनी कोंबडा बनत चालण्याची शिक्षा दिली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या या शिक्षेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. अशा प्रकारची शिक्षा देणं योग्य नसल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी ट्विट करत यावर भाष्य केलं आहे. कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं तर त्यावर कायदेशीर कारवाई करता येते. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे.

दरम्यान, निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाची लागण!

‘…तर मग लॉकडाऊन कराच’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर हरभजनसिंग आक्रमक

‘उद्धवजी, समस्या ही आहे की…’; लॉकडाऊनवरून आनंद महिंद्रांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

जाणुन घ्या… महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मनाला सुन्न करणारा व्हिडीओ! बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून काढली धिंड, मातोंडकरही भडकल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More