बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील 15 दिवस महत्त्वाचे! गणेशोत्सवानंतर ‘या’ शहरात तिसऱ्या लाटेची शक्यता

मुंबई | कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे तर चिंतेत आणखी वाढ केली आहे. आटोक्यात आलेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत चालत असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता कोरोनाची तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

नुकताच गणेशोत्सव पार पडला. कोरोना निर्बंधांचे पालन करत अगदी साधेपणानं हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र या काळात कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता प्रशासनानं पुढील 15 दिवस मुंबईसाठी महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. गतवर्षी गणेशोत्सवानंतरच कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवानंतरच्या 15 दिवसांवर प्रशासनाची बारीक नजर असणार आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बरेच लोक मुंबईच्या बाहेर गेले होते. मात्र आता गणेशोत्सव पार पडल्यानंतर पुन्हा ते मुंबईत येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. बाहेरुन येणाऱ्या या लोकांनी आरटीपीसीआर चाचणी करावी, असं आवाहन मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे सध्या मुंबईकरांना काळजी घेण्यास सांगितलं असून पुढील 15 दिवस महत्त्वाचे असल्याचं म्हटलंय आहे.

थोडक्यात बातम्या – 

भारताची ‘व्हॅक्सिन मैत्री’! आता इतर देशांनाही पुरवणार कोरोना लस

आम्ही चौकशी केली, त्यात कोणताही घोटाळा झालाच नाही’; देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

“आमचा विश्वासघात झालाय, ‘ते’ मुख्यमंत्रिपदाच्या लायक नाहीत”

राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अलर्ट जारी

चांगलं केलं की चांगलंच होतं, आता वेळच सर्व गोष्टींना उत्तर देईन – सोनू सू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More