Top News आरोग्य कोरोना मुंबई

मुंबईकरांनो सावधान! कोरोनाच्या रूग्णांमध्ये गेल्या 4 दिवसांत लक्षणीय वाढ

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

राजधानी दिल्लीत कोरोनाने पुन्हा शिरकाव केलाय तर मुंबईत देखील हा संसर्ग पुन्हा डोकं वर काढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मागील दोन दिवसात मुंबईत एक हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेत.

मुंबईत 18 नोव्हेंबर रोजी 871 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले होतं. तर १९ नोव्हेंबरला 924 रुग्ण आढळून आले. 20 नोव्हेंबर रोजी रुग्णसंख्या हजारांच्या पलिकडे गेली. मुंबईत 1031 रुग्ण आढळून आले. तर 21 तारखेला 1092 रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या सांगण्यानुसार, “मुंबईसाठी पुढील 3-4 ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. अद्याप कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाहीयेक.परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतरच निर्णय घेतला जाईल.”

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोनाचं राजकारण करतायत; संजय राऊत यांची टीका

भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्वप्नातच ठरवावा; अनिल परब यांचा आशिष शेलारांना टोला

18 तासांच्या चौकशीनंतर भारतीचा पती हर्ष लिंबाचियाला देखील अटक

पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चंद्रयान नव्हे; मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या