मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. राज्यातील मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत कोरोनानं अक्षरशः कहर माजवला आहे. शनिवारी कोरोनाचे 9,090 रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. तर शहरात कोरोनाचे शुक्रवारी 8,832 नवीन रुग्ण सापडलेत.
राज्यात दिवसभरात 49 हजार 447 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज दिवसभरात 37 हजार 821 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात दिवसभरात 277 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 55 हजार 565 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय.
पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा, असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.
पुण्यामध्ये आज दिवसभरात 5 हजार 720 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3 हजार 293 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 44 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 9 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.
थोडक्यात बातम्या-
“उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा”
पुण्यात 6 ते 6 संचारबंदीचा पहिलाच दिवस अन् कोरोनाबाधितांचा आकडा काळजाचा थरकाप उडवणारा!
लसीकरणानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात का? तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्टीकरण
‘आयपीएल’ सुरू होण्यास फक्त 6 दिवस शिल्लक असताना; ‘या’ मैदानात खेळाडूंच्या आधी कोरोनाची ‘एन्ट्री’
सचिन वाझेंना दिलासा नाहीच; पोलीस कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.