सांगली | महापालिका निवडणुकीमध्ये मनसे एकाही जागेवर उमेदवार उभा करू शकला नाही. 78 जागेसाठी ही महापालिका निवडणूक होणार आहे, मात्र मनसेला इथं उमेदवारच भेटला नाही.
मागील निवडणुकीत मनसेने 36 जागा लढवल्या होत्या. मात्र गेल्या पाच वर्षांत मनसेचे अस्तित्व फारसे शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे सांगलीत मनसे संपुष्टात आली आहे.
पक्षातील चेहरा म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार नितिन शिंदे व मनसेच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा स्वाती शिंदे, शहराध्यक्ष अमर पडळकर यांनी भाजप व राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागत मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-भाजपला मोठा धक्का; भाजपचे दिलीप सुर्यवंशी राष्ट्रवादीत दाखल!
-नरेंद्र मोदी फक्त अंबानीलाच खाऊ घालतात!
-पावसासाठी प्रशासन सज्ज आहे; मुख्यमंत्र्यांचा दावा
-जनतेला सुखी करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणणार आनंद मंत्रालय!
-मागासवर्गीयांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचा कट- धनंजय मुंडे