Top News

पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार!

पुणे | पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.

13 डिसेंबरला कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुण्यातील शाळा उघडण्याबाबत निर्णय घेऊ, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे महापालिका क्षेत्रातीलही सर्व शाळा 13 डिसेंबरर्यंत बंद राहणार आहेत.

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. याशिवाय ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“राज्यपाल नियुक्त आमदारकी म्हणजे नेत्यांची सोय लावण्याची जागा नाही”

“मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड बाहेर जाणार नाही याची काळजी तर सुपुत्राला बार आणि पबची”

मनसे नेत्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी!

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही- चंद्रकांत पाटील

“जोपर्यंत वीज बिल 50 टक्के माफ होत नाही, तोपर्यंत ती भरू नका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या