बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुश्रीफ म्हणाले, ‘दादांकडून भाजप प्रवेशाची ऑफर’, आता चंद्रकांत पाटील म्हणतात….

पुणे | किरीट सोमय्या आणि हसन मुश्रीफ यांच्या वादात आता महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावताना चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती, असं खळबळजनक वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलं आहे. हसन मुश्रीफ हे ड्रामा करत आहेत. मी त्यांना कसलीही ऑफर दिली नाही. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हसन मुश्रीफ यांच्यावर आता कारवाई होणार या भितीनं ते माझ्यावर आरोप करत आहेत. हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती, असं स्पष्ट करताना एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. कुणालाही त्रास देणं हे आमच्या संस्कृतीत नाही. हसन मुश्रीफ यांनी हा सगळा ड्रामा बंद करावा, असं चंद्रकात पाटील यांनी म्हटलंय.

अमुक-तमुक करणार, माझे समर्थक रस्त्यावर उतरतील असं बोलून मुश्रीफ कारवाईपासून लपत आहेत. त्यांनी कायद्याची लढाई कायद्याने लढावी, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या 

‘मला सहा तास कोंडून ठेवलं, अन्…’,पत्रकार परिषदेत सोमय्यांचा गंभीर आरोप

झंझावाती खेळी करत ऋतुराज गायकवाडने ‘हा’ विक्रम केला आपल्या नावावर

देव तारी त्याला कोण मारी! धावत्या रेल्वेमध्ये चढताना महिलेचा तोल गेला अन्…

सोमय्यांच्या आरोपांमागे भाजपमधील ‘हा’ नेता; मुश्रीफांचा धक्कादायक आरोप

“चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थ दाखवावा, समोर येऊन लढावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More