बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समीर वानखेडेंचं टेंशन वाढलं; ‘ती’ कागदपत्रं शेअर करत नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) रोज नवनवीन खुलासा करत गौप्यस्फोट करत असतात. मलिकांचं रोज नवीन ट्विट आणि नवीन खुलासा अशीच मालिका सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ पहायला मिळत असते.

नवाब मलिक यांनी आज नवीन ट्विट करत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. यावेळी मलिकांनी दोन ट्विट करत नवीन बाॅम्ब फोडला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या (Sameer Wankhede) मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप केला आहे.

नवाब मलिकांनी पहिल्या ट्विटमध्ये मित्रांनो सतर्क राहा. ब्रेकिंग न्यूज येत आहे, असं म्हटलं. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, अजून एक फर्जीवाडा. अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य आहेत ज्ञानदेव वानखेडे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्ज प्रकरणावरुन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. कागपत्र शेअर करत त्यांनी वानखेडेंवर चांगलाच निशाणा साधला आहे. एवढंच नव्हे तर मलिकांनी वानखेडेंच्या कुटुंबावरही बरेच आरोप केले आहेत.

 

थोडक्यात बातम्या – 

एसटी संपाचा तिढा सुटणार का?; गोपीचंद पडळकर म्हणाले…

बिग बॉसच्या घरात कोरोनाची वाईल्ड कार्ड एन्ट्री; ‘या’ सदस्याला कोरोनाची लागण

गृहिणींचं बजेट मोडलं! ‘या’ भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ

इंधन दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; वाचा आजचे ताजे दर

RBIनं ‘या’ बॅंकेवर घातली बंदी, खात्यातून फक्त 10 हजार काढण्याची मुभा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More