Top News महाराष्ट्र मुंबई

“मुस्लिम चार विवाह करतात, धनंजय मुंडेंनी दोन केले तर काय बिघडलं?”

नवी मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दोन पत्नीसंदर्भातील द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांनी कायद्याचे उल्लंघन केलं नाही, असं म्हणत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी पाठराखण केली.

त्याचबरोबर मुस्लिम नागरिक चार विवाह करु शकतात, मग हिंदू व्यक्तीने दुसरे लग्न केले, तर चुकीचे काय?, असा सवालही सेंगर यांनी विचारला.

सेंगर म्हणाले की, “भारताच्या राज्यघटनेने सर्व धर्म समभाव तत्त्व स्वीकारले आहे. त्यामुळं सर्व धर्मांना विवाह बंधनाचे वेगवेगळे कायदे असू शकत नाहीत. असले तरी ते निरर्थक ठरतात. फक्त हिंदू धर्मीयांनाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होऊ शकत नाही.”

तसंच, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये करुणा शर्मा यांच्याशी लग्न केल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. करुणा शर्मा आपली पत्नी असल्याचा कोणताही दावा त्यांनी केलेला नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केल्यानुसार त्यांचे एकच लग्न झाले असल्याचही सेंगर यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जावयाला एनसीबीकडून समन्स

गुजरातच्या मंदिरांमध्ये भाविकांना ‘साष्टांग नमस्कार’ घालण्याची परवानगी नाही तर…

कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं मोठं वक्तव्य म्हणाले…

पुणे जिल्ह्यासाठी ‘इतक्या’ कोरोना लसीच्या डोसची गरज- डाॅ. राजेश देशमुख

“हा संघर्ष शेतकरी-कामगार विरोधी कायदे संपेपर्यंत सुरुच राहील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या