Top News देश

“मातृभाषेत शिक्षण देणारं वैद्यकीय, तांत्रिक महाविद्यालय प्रत्येक राज्यात असावं”

Photo Credit- Facebook/ narendra Modi

नवी दिल्ली | प्रत्येक राज्यामध्ये मातृभाषेत शिक्षण देणारे किमान एक मेडिकल आणि एक तांत्रिक महाविद्यालय असावं हे माझं स्वप्न आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आसाममधील सोनितपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सोनितपूर जिल्ह्यातील धेकियाजुली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘असोम माला’ कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.

ईशान्य भारत विकासाच्या मार्गावर आहे आणि त्यात आसाम महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सामुहिक प्रयत्नांमुळे चांगली कामगिरी कशी करता येते याचं आसाम हे उत्तम उदाहरण आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, आसाममध्ये भाजप सत्तेत आल्यास अशा महाविद्यालयांची पायाभरणी करु, असं आश्वासनही मोदींनी दिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, जोशीमठ धरण फुटल्याने अनेकजण वाहुन गेल्याची भित

राज्यातील भाजप नेत्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’- रोहित पवार

छातीत दुखत असल्यामुळे तो डॅाक्टरांकडे गेला; रिपोर्ट पाहून डॅाक्टरांनाही बसला धक्का

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ट्विटवर राज ठाकरेंचं नेमकं बोट; पाहा व्हिडीओ

‘आम्ही शरजीलसोबत आहोत’; एल्गार परिषदेच्या आयोजकांचा उस्मानीला पाठिंबा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या