मुंबई | राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप शेवटून एक नंबर आहे. चंद्रकांत दादांचे गणित कच्चे असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली आहे, असं सांगत ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच एक नंबर असल्याचा दावा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
धुळ्यात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी अब्दुल सत्तार बोलत होते.
राज्य सरकार गेल्या 16 महिन्यांपासून आहे तिथेच आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार पडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत. तसंच माझं नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार, असं म्हणत सत्तार यांनी खासदार रावसाहेब दानवेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरुन भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं, अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला.
थोडक्यात बातम्या-
‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
“एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं”
अनैतिक संबंधांमध्ये पैसा ठरला वरचड; प्रियकरानं प्रेयसीचा जीवच घेतला!
सुंदर मुली दाखवायच्या अन्… तुमच्यासोबतही हा प्रकार घडत असेल तर सावधान; पोलिसांचं आवाहन
“श्री राम नाव घेतल्यानं काहींना राग का येतो?”