Top News देश

‘माझी पक्षात घुसमट होतीये’; ‘या’ खासदाराची राज्यसभेत राजीनाम्याची घोषणा

Photo Credit- Rajyasabha TV video Screen Shot

नवी दिल्ली | तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राजीनामा देण्याची घोषणा केली. त्रिवेदी यांनी केलेल्या घोषणेमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दिनेश त्रिवेदी यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत दिनेश त्रिवेदी यांनी सहभाग घेतला होता. त्यांना बोलण्याची संधी मिळताच त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अचानक राजीनामा देण्याची घोषणा केली. माझी पक्षात घुसमट होत आहे, असं दिनेश त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.

वास्तविक पाहता जन्मभूमीसाठी आम्ही काम करत आहोत. आता सहन होत नाही. पक्षात अनेक मर्यादा येत आहेत. नेमके काय करावे हेच सूचत नाही. माझी आता घुसमट होतेय. तेथे अत्याचार होताना दिसत आहेत, असं दिनेश त्रिवेदी म्हणाले.

आता बंगाली जनतेमध्ये जावं, हा अंतरात्म्याचा आवाज आहे. त्यामुळे या क्षणी येथे चर्चेला उभा असताना राजीनामा देत आहे. देशासाठी आणि बंगलाच्या जनतेसाठी नेहमी पुढाकार घेऊन काम केलं आहे आणि यापुढेही करत राहीन, असं त्रिवेदी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून त्याने सांडपाण्याच्या नळीत लपवलं 21 लाखांचे सोनं!

कुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवलं

हनिमूनच्या रात्री नवऱ्याचं वागणं पाहून नवरीही हैराण, प्रकार पाहून तुम्हीही चकीत व्हाल!

“मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे, त्यामुळे मला काही अडचण येत नाही”

न्यूज चॅनेलवर बोलताना तोल सुटला, भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तुफान राडा!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या