नगरमध्ये सुजय विखेंना लोकसभा उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा???

अहमदनगर | नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या चिरंजीवांना म्हणजेच सुजय विखेंना लोकसभा उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा मोकळा झाला आहे, असं सूत्रांकडून समजतंय.

नगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.  अहमदनगरची जागा मिळविण्यात काँग्रेसला यश आलं असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी जागांचा तिढा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जवळपास सोडवला आहे, असं चित्र आहे.

दरम्यान, सुजय विखे पाटील नगरची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

-“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”

-आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले

-“…तर उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढवावी”

-“एरवी एकमेकांचे ‘चेहरे’ न पाहणारे महाआघाडी करतायेत”