बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नागिन’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं सोडला अभिनय; केला ‘हा’ मोठा खुलासा

मुंबई | बरेच कलाकार काही ना काही कारणानं सिनेसृष्टीतून ब्रेक घेत असतात. तर काही जण सिनेसृष्टीला काही कारणास्तव कायमचं रामराम ठोकतात. ‘नागिन’ फेम अभिनेत्री अनिता हसनंदानी सध्या आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळं जास्तचं चर्चेत आहे. अनिताने काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या ती तिच्या मातृत्वाचं पात्र प्रत्यक्ष जीवनात अनुभवत, आनंद घेत आहे . अनिता आपला पूर्ण वेळ तिच्या मुलाला देत आहे. तिच्या मुलाचं नाव आरव असं आहे.

अनिता हसनंदानीने नुकताच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली आहे. अनिताने पोस्ट टाकत आपण अभिनय सोडत असल्याचं सांगितलं आहे. मात्र, त्यामुळे तिचे चाहते खुपचं दु:खी झाले आहेत. म्हणून अनिताने ट्वीट करत, आपण हा निर्णय का आणि कशासाठी घेतला आहे, याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सगळीकडे अशी माहिती पसरवली जात आहे की, मी माझं पहिलं प्रेम ‘अभिनय’ सोडून देत आहे. पण मी असं कधीचं म्हटलं नाही. मी असं म्हटलं की, मी सध्या फक्त माझ्या मुलावर लक्ष देऊ इच्छिते. सध्या आरव माझी प्राथमिकता आहे. मी ज्यावेळी पूर्णपणे तयार असेन त्यावेळी नक्की अभिनयाकडे परत येईन.

अनिताने एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं होतं. एका मुलाखतीत अनिताने सांगितलं होतं, की ती सध्या आपला संपूर्णवेळ आरवसोबत घालवू इच्छिते. अनिता म्हणते, मी आधीचं सांगितलं होतं, की ‘जेव्हा मी आई होईन तेव्हा मी इंडस्ट्री आणि माझं काम सोडून देईन. सध्या मी माझ्या आईची भूमिका चांगल्या पद्धतीने साकारू इच्छिते’.

दरम्यान, अनिताने सांगितलं की मी पूर्णपणे टीव्ही मालिकांमध्ये कधी परत येईन माहिती नाही. पण मी जेव्हा परत येईन सर्वांना नक्कीच समजेल. तर, मी सध्या काही काम करत आहे, कारण ते मी आधीच साईन केलं होतं.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात, पण ‘या’ 6 जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक

“‘या’ राज्यातील भाजपचं सरकार जाणार हे नक्की”

‘या’ शहरातील कोरोना आला आटोक्यात; सक्रिय रुग्णसंख्येत लक्षणीय घट

“उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप”

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More