बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागीन फेम पर्ल पूरीला बलात्कार प्रकरणी अखेर जामीन

मुंबई | प्रसिद्ध मालिका ‘नागीन’ मध्ये प्रमुख भूमिका साकरणाऱ्या अभिनेता पर्ल पूरीला काही दिवसांपुर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 11 जूनला झालेल्या सुनावणीत त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र मंगळवारी वसई सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्याचं समोर आलं आहे.

मुंबईला लागून वसई नायगाव येथे पर्ल एका मालिकासाठी शूट करत होता. ज्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पर्लवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्याची पत्नीदेखील या मालिकेचा एक भाग होती. ही मुलगी पर्लला त्याच्या ऑन-स्क्रीन नावाने ओळखत असे. ही तक्रार केवळ मुलीच्या वडिलांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. याबाबत आईकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

दरम्यान, पीडितेच्या आईनेच पर्ल निर्दोष असल्याचं सांगितल्याचा दावाही एकताने केला होता. पर्लवर पॉक्सो कायद्या अंतर्गत कारवाई झाल्यामुळे जामीन मिळण्यास अडचणी येत होत्या. आयपीसी कलम सीआर आयपीसी 376 एबी, आर/डब्ल्यू पोक्सो कायदा, 4, 8, 12,19, 21 अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, 11 जूनला झालेल्या सुनावणीत त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र मंगळवारी वसई सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्याचं समोर आलं आहे. इतकं होऊन देखील पर्लचे चाहते त्याला आजही तितकेच प्रेम देत आहेत.

थोडक्यात बातम्या-

अनोखं संशोधन! आसपास कोरोना रुग्ण असेल तर 15 मिनिटांत वाजणार अलार्म

मनसुख हिरेन प्रकरणातील स्फोटकांनी भरलेल्या कारचं लातूर कनेक्शन उघड

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार चाहत्यांच्या भेटीला

‘तू तर अंतर्वस्त्र घालायची विसरली’, बोल्ड लुकमुळे ‘ही’ अभिनेत्री होतेय ट्रोल

शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती म्हणाल्या…

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More