बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुकाराम मुंढेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच गैरव्यवहाराचा आरोप, महापौरांनी उचललं मोठं पाऊल!

नागपूर | मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात २० कोटींचा घोटाळा केला असून मर्जीच्या कंत्राटदारांनाच कंत्राट दिलं असल्याचा आरोप नागपुरचे महापौर संदीप जोशी यांच्याकडून करण्यात आला आहे. तुकाराम मुंढेंविरोधात त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन अधिकाऱ्यांसोबत मिळून पदाचा गैरवापर केला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात जबरदस्तीने २० कोटी रूपये त्यांच्याकडून ट्रान्स्फर करण्यात आले असून या प्रकल्पात अनेक गैरव्यवहारही झाले आहेत. असे आरोप संदिप जोशी यांनी माध्यमांशी बोलताने केले आहेत.

नागपुरात महापौर व आयुक्त यांच्यातील वाद आता टोकाला पोहचला आहे. व्यक्तिगत प्रतिमा हनन केल्याचा आरोप करत मुंढे यांनी नुकताच सभात्याग केला होता. यानंतर आयुक्त मुंढे व महापौर जोशी यांच्यात बरीच शाब्दिक चकमकही पहायला मिळाली.

महापौर दुटप्पीपणे वागत असल्याचा आरोप तुकाराम मुंढेनी केला आहे. प्रत्युत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे महापौरांचे फोन उचलत नाही, त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये असा टोलाही संदीप जोशींकडून लावण्यात आला. स्मार्ट सिटी घोटाळ्यातील आरोपांनी आता या वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘अ‌ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती’चं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण, शरद पवारांची विशेष फेसबुक पोस्ट

सुशांतच्या दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शब्द

आणखी एक परीक्षा पुढे ढकलली, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात काल नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त! वाचा पुण्याची कोरोना स्थिती….

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, वाचा काल दिवसभरातली आकडेवारी…

राजस्थानमध्ये आकाशातून पडलेल्या ‘या’ वस्तूची किंमत खरंच करोडो रुपये आहे का?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More