नागपुरात पावसाचा कहर! गावांना पाण्याचा वेढा, शहरात वीजपुरवठा खंडित; नागरिकांचे हालच हाल

Nagpur Rain | विदर्भाला पावसाने झोडपून काढले आहे. त्यात नागपुरात तर पावसाने कहर केला आहे. पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. नागपूर विमानतळाचे प्रवेशद्वारच पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. विमानतळासमोर पावसाने तळे साचले असल्याने प्रवाशांची मोठी पंचाईत (Nagpur Rain ) झाली आहे.

त्याचबरोबर पोलिसांनी विमानतळाकडे जाणारा रस्ता बॅरिकेट टाकून बंद केल्याने विमानतळापर्यंत पोहोचणेही प्रवाशांना कठीण झाले आहे. पावसाचा जोर वाढल्याने नागपुरातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

नागपूर पाण्याखाली, नागरिकांचे प्रचंड हाल

काही तासातच नागपुरात 90.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील नरेंद्र नगर, भांडेवाडी, शिवशक्ती नगर, पिवळी नदी, मानकापूर येथील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे (Nagpur Rain ) जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान विभागाने नागपूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला होता. काल रात्रीपासून पावसाने येथे नुसता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागपूर पुन्हा एकदा पाण्यात गेले आहे. नागपूरजवळील पिपळा गावाला पावसाच्या पाण्याने वेढा दिला असून गावातील 4हजार नागरिक अडकून पडले आहेत.

शहरातील वीजपुरवठा खंडित

दुसरीकडे शहरातील (Nagpur Rain ) काही भागात झाडाच्या फांद्या तारांवर पडल्याने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. शहरातील बऱ्याच भागात वीज पुरवठा सुरू-बंद होत असल्याचे चित्र आहे. महावितरणच्या बेसा परिसरातील सुतगिरणी उपकेंद्रामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने 33 केव्हीचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

गडचिरोलीमध्ये देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. येथे कालपासून 52.0 मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात 40 पैकी 13 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा मंडळामध्ये सर्वाधिक 270.8 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी सिरोंचा मुख्यालयी 184 मिमी पाऊस पडला आहे.

News Title – Nagpur Rain update

महत्त्वाच्या बातम्या-

“UPSC सारख्या प्रक्रियेत गडबड म्हटल्यावर..”; पूजा खेडकर प्रकरणी प्रियंका गांधी संतापल्या

मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून मोठी माहिती समोर

अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?, अजित पवार गटातील आमदाराचं सूचक विधान

विधानसभेपूर्वीच अजितदादांना धक्का?, ‘या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

गुड न्यूज! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं, चांदीचाही मोठा दिलासा