नागपूर महाराष्ट्र

नागपुरात नदी नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरूवात

नागपूर |  नदी-नाल्यांच्या भिंतीवर घरांचे खांब उभारीत किंवा नाल्यांमध्ये स्तंभ टाकून पाण्याचा प्रवाह अडविणाऱ्या अतिक्रमणांवर मनपातर्फे कारवाईला सुरुवात झाली आहे. दहाही झोनअंतर्गत असलेल्या अशा अतिक्रमणांचा यात समावेश आहे. नागपूर शहरातील नाग नदी, पिली नदी आणि पोहरा नदी या तीन मुख्य नद्यांसह वस्त्यांमधील मोठ्या नाल्यांवर, नाल्यांच्या भिंतीवर अथवा नाल्यांमध्ये स्तंभ टाकून पक्की घरे बांधण्यात आली आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशा घरांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते.

या सर्वेक्षणात अनेक गंभीर बाबी आढळून आल्यात. चक्क नदी-नाल्यांमध्ये स्तंभ टाकून पाण्याचा प्रवाह अडविण्यात किंवा वळविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बांधकामांसाठी मनपाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. सर्वेक्षणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या यादीनुसार अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस देण्यात आली. सदर अतिक्रमण तातडीने काढण्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र बहुतांश अतिक्रमितांनी नोटीशीची दखल न घेतल्याने सदर अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व झोन आयुक्तांना दिले. त्यानुसार अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

लकडगंज झोन अंतर्गत येत असलेल्या आदर्शनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नाल्यावर अतिक्रमण केले आहे. दोन ते तीन मजली इमारती बांधल्या आहेत. अशा चार इमारतींना मनपाच्या अतिक्रमण पथकाने जमीनदोस्त केले. या झोपडपट्टीतील काहींना पट्टे प्राप्त आहेत. मात्र बांधकाम करताना मनपाची परवानगी घेतली नाही. अशा चार घरांवर कारवाई सुरु आहे. सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणाऱ्या चांभार नाल्यावरील तीन बांधकामेही पाडण्यात आले.

या अतिक्रमणांमुळे पावसाचे पाणी अडून वस्त्यांमध्ये शिरते. यामुळे मालमत्तेचे नुकसान होते. कुणालाही बेघर करणे हा मनपाचा उद्देश नाही. मात्र नियमांच्या विरुद्ध जाऊन चक्क नाल्यावरच घर बांधणे आणि पावसाळ्यात इतरांच्या मालमत्तेचे नुकसान करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून अशी अतिक्रमणे काढावीत, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. मनपाच्या आवाहनाची दखल घेतली नाही तर सर्व अतिक्रमणे मनपाकडून काढण्यात येईल आणि त्याचा संपूर्ण खर्च घरमालकाकडून आकारण्यात येईल. शिवाय गुन्हेसुद्धा दाखल करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

विद्यार्थ्यांना फी साठी सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे- बच्चू कडू

भाजपच्या किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण

चहा पिताना एकमेकांकडे पाहणं पडलं महागात, तिघांनी तरूणावर कोयत्याने केले वार

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत…., ग्रामविकास मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

आज ६७११ रूग्ण बरे होऊन घरी, तर राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्क्यांवर- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या