Top News महाराष्ट्र मुंबई

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून अनिल देशमुखांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं. नियम बाजूला ठेवून हे प्रकरण दाबण्यात आलं, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

अर्णव गोस्वामी यांनी मला पैसे न दिल्याने मी आत्महत्या करत आहे, अशी सुसाईड नोट अन्वय नाईक यांनी लिहिली होती. या आत्महत्येनंतर मागच्या सरकारने अन्वय नाईक प्रकरण दाबण्यासाठी मंत्रालयात मिटिंग घेतली होती, असं अनिल देशमुखांनी सांगितलं.

पत्रकार अर्णव गोस्वामींना वाचवण्यासाठी नाईक आत्महत्या प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्या गेल्याचं नाईक यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आम्ही कारवाई सुरू केली आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकारने ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांची टीका

ठाकरे सरकार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लायक, पण…- देवेंद्र फडणवीस

ज्यांनी चिरडण्याची भाषा केली ते फार काळ टिकले नाहीत- देवेंद्र फडणवीस

“उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही”

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या