बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती काँग्रेस नेत्यांनी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कोअर कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

राजीव सातव यांच्या निधानाने रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून संजय उपाध्याय यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ भारतीय कंपनीची इलेक्ट्रीक बाईक बाजारात दाखल; किंमत पेट्रोल बाईकपेक्षा कमी

“सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चौकशांना मी घाबरत नाही”

”देशात तालिबानी राजवट लागू होऊ देणार नाही, मी जिंकले नाही तर…”

“भारतात बसून अंग मोडून आलं होतं, ती खास विमानंसुद्धा धूळखात पडून होती”

जिंकलेला सामना गमवायची पंजाबला सवय झाली आहे – अनिल कुंबळे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More